देव्हारी गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा

🏛️ देव्हारी गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा 


सोयगाव प्रतिनिधी – सुनील चव्हाण

सोयगाव तालुक्यातील देव्हारी गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी उपस्थित राहून गावकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व त्यावर मार्गदर्शन केले.

या बैठकीत गावातील विकासकामे, शासकीय योजना तसेच लोकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकारी वर्गाने उपस्थितांना आश्वासन दिले की, प्रत्येक समस्येचा प्रशासकीय पातळीवर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल.

या ग्राम दरबार सभेला सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षण विभागाचे अभियंते तसेच तालुक्यातील इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रातील कामकाज व योजनांबद्दल माहिती देत नागरिकांना मार्गदर्शन केले.

या वेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, माजी सरपंच पंडित राठोड, मेघराज चव्हाण, चेअरमन गोविंद प्रेमदास, नरसिंग रंगलाल, पुना करतार चव्हाण, आकाश देवराज, आकाश गुलाब, गुलाब टेलर, गुलाबरावजी सोनू ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

गावकऱ्यांनी शासन अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपली मते आणि अडचणी मांडल्या. या दरबार सभेने गावाच्या विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.


Post a Comment

أحدث أقدم