आय लव्ह मोहम्मद" फलक प्रकरण – बुलडाणा जिल्ह्यातून राष्ट्रपतींना निवेदन
बुलडाणा (दि.19 सप्टेंबर 2025) –
मुस्लिम सैय्यद इकबाल अब्बास वेल्फेअर असोसिएशन तर्फे आज राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवण्यात आले.(धाड प्रतिनिधी अबूजर मिर्झा)
या निवेदनात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद मिलादुन्नबीच्या मुबारक प्रसंगी सय्यद नगर परिसरात काही युवकांनी “आय लव्ह मोहम्मद” असे फलक लावल्याप्रकरणी 25 मुस्लिम युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा अध्यक्ष इकबाल अब्बास व जिल्हा उपाध्यक्ष शेख सादिक शेख मोबीन यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की :
- या युवकांवर कारवाई करणे हा भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(अ) मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 25 मधील धर्मपालन स्वातंत्र्य व कलम 21 मधील वैयक्तिक स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारांचा भंग आहे.
- पैगंबर मोहम्मद साहेबांच्या 1500 साला ईद मिलादुन्नबीसारख्या ऐतिहासिक क्षणी अशी पोलिसांची कारवाई निंदनीय आहे.
- या घटनेमुळे देशभरातील मुस्लिम समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संस्थेने राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे की,
- या प्रकरणातील सर्व युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
- साम्प्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
हे निवेदन मौलाना आझाद चौक, धाड, ता. बुलडाणा येथून राष्ट्रपती महोदयांना पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली.
