अल्पसंख्याक अमराठी शाळांमधील मराठी भाषा फाऊंडेशन वर्गासाठी शिकवित असलेल्या शिक्षकांचे मानधन वाढविण्यात यावे; शेख अब्दुल रहीम

अल्पसंख्याक अमराठी शाळांमधील मराठी भाषा फाऊंडेशन वर्गासाठी शिकवित असलेल्या शिक्षकांचे मानधन वाढविण्यात यावे;  शेख अब्दुल रहीम 

प्रतिनिधी नईम शेख सिल्लोड 

अल्पसंख्याक विकास मंत्री मा. ना.श्री.अब्दुलजी सत्तार साहेब यांना निवेदन सादर!छत्रपती संभाजीनगर:   महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभागाकडून मागील 14 वर्षापासून मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजना ही मा. पंतप्रधानाच्या अल्पसंख्याक कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमाचा एक भाग आहे. यामध्ये अल्पसंख्याक अमराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सदर  मराठी भाषा फाऊंडेशन वर्गासाठी शिकवित असलेल्या शिक्षकांच्या समस्या,विविध प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी थेट अल्पसंख्याक विकास मंत्री मा. ना.श्री.अब्दुलजी सत्तार साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून  सादर केले.`निवेदनात मानसेवी शिक्षकांसाठी केलेल्या  मागण्या...१) शिक्षकांचे मानधन 5000₹ हे अगदी तुटपुंजे आहे.वाढत्या महागाईच्या काळात त्यात उदरनिर्वाह होत नाही,तरी ते 25000₹ करण्यात यावे व ते नियमितपणे दर महिन्याला मिळावे.२) मानसेवी शिक्षकांची नियुक्ती 9 महिन्याऐवजी 12 महिन्यांची करावी व त्यांना सेवेत कायम करावे.३)विद्यार्थी संख्या अट शिथिल करावी. ४)शिक्षक मागील 12 ते 14 वर्षापासून काम करत आहेत तरी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे.  यावर अल्पसंख्याक विकास मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी लवकरच जे शक्य होईल ते निर्णय घेण्यात येतील. आणि मानसेवी शिक्षक यांच्या मानधन वाढीबाबतही सकारात्मक प्रतिसाद दिला.


Post a Comment

أحدث أقدم

2

3