शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे शक्ती पीठ साकारणार.राजेंद्रसिंह नरुकांची घोषणा.

 शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे शक्ती पीठ साकारणार.राजेंद्रसिंह नरुकांची घोषणा. धुळे.१८(गोकुळ देवरे)श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या पुर्णात्वा बरोबरच देशातील संकल्पीत चार शक्ती पीठांपैकी पहिले शक्तीपीठ तामथरे असणार असल्याची घोषणा श्री.रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर राजेंद्रसिंह नरुका यांनी तामथरेत श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान अंतर्गत कार्यरत गोशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना केली. श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान संचलीत गीर गो शाळेचा शुभारंभ पश्चिम बंगाल मधील कुच बिहारचे खासदार अनंतराव देव नारायण यांच्या हस्ते व राजेंद्र सिंह नरुका,व्रुदांवनच्या धर्म रक्षा पीठाचे संस्थापक अध्यक्ष कौशल किशोर ठाकूर,श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ. प.महेंद्र महाराज मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष रवी शेठ राजपूत सल्लागार सदस्य जेष्ठ पत्रकार महेशबाबा घुगे जवाहर सामाजिक ट्रस्टच्या अश्विनी कुणाल पाटील,भूमी दाते पुरुषोत्तम येवले,कोमल सिंग  गिरासे,पींटू दादा इंद्रसिंग,विरेंद्र सिंग गिरासे,ऍड.दिलीप मिस्त्री आदींच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार अनंतराय देवनाराणजी यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आला.वैफल्यग्रस्त लोकांना सदाचाराचे धडे देण्यासाठी श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान सारख्या संस्थाची गरज आहे.भविष्यात तामथरे हे प्रती व्रुंदावन आणि शक्ति पीठ म्हणून नावारुपाला येईल असा आशावाद प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केला. ह.भ.प.महेंद्र महाराज यांनी आभार मानताना श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांनच्या कार्यप्रणालीची आणि लोक सहभागाची माहिती दिली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला,धुळे,नंदुरबार,जळगाव,नासिक जिल्ह्यातील श्रद्धावंत भाविक प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم

2

3