धुळे दि.२८. प्रतिनिधी (गोकुळ देवरे.)
आदरणीय सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट,धुळेतर्फे ६० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
पुज्य सिंधी जनरल पचांयत ट्रस्ट,कुमारनगरचे १० व १२ वीत ८०% पेक्षा जास्त गुण मिळविले विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. कुमार नगर जनरल पचांयत.येथे १० वी १२ वीच्या गुणी विद्यार्थ्याचा पुज्य सिंधी जनरल पंचायतचे सर्व पदाधिकारी श्री गुलशन उदासी,प्रकाश छबीया किशोर डियालानी,सुरेश चंदणाणी,डॉ.नारायण कंदनानी राजकुमार गुरवशानी गष्णनी,काशिश उदासी इमतो खजी,उत्तम वचाशानी, रमेश गोवाणी,नरेश श्रीचंद छवीया,परसराम दियाकानी,सोनी गोद्यवाणी,पकच दुष्मनी,सोनु ठाकुवाणी,भागेश हुए,राहुल सेवाळानी यांच्या तर्फे साठ गुणी विद्यायांना,स्मृती चिन्ह,प्रमाण पत्र काॅलेजबॅग देऊन सन्मान करण्यात आले.या कार्यकमाचे अध्यक्ष श्री गुलशन उदासी यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सर्वांना अभिनंदन व समाजाच्या सर्व कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी समाजातला आपले कर्तव्य पार पाहावे आणि देशासाठी,निर्सगासाठी, समाजासाठी आपण १००% योगदान द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख परेश सुमवया हे होते.सुत्रसंचालन कु.हिना यांनी केले.
