दिगांव येथे शालेय समितीत सुसूंद्रे व पठाण यांची निवड

 


दिगांव येथे शालेय समितीत सुसूंद्रे व पठाण यांची निवड


प्रतिनिधी जाकेर बेग अंधारी


दिगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कारभारी सुसुंद्रे, तर उपाध्यक्षपदी इम्रान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दिगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी कारभारी दौलत सुसुंद्रे, तर उपाध्यक्षपदी इम्रान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

  यावेळी सरपंच पुंजाराम सुसुंद्रे, मुख्याध्यापक विलास आगळे, कैलास जाधव, राहुल कुंभारे, गवळी, दिगंबर पाटील, शिक्षक दिगंबर सुसुंद्रे, योगेश गजभार यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

2

3