धान्य साठविण्यासाठी पत्र्यांच्या कोठीला नागरिकांची पसंती : पूराणी कणगी झाली कालबाह्य

धान्य साठविण्यासाठी पत्र्यांच्या कोठीला नागरिकांची पसंती :  पूराणी कणगी झाली कालबाह्य : 

कदीर पटेल घाटनांद्रा प्रतिनिधि: धान्य साठविण्यासाठी वापरली जाणारी कणगी झाली कालबाह्य: पुर्वीच्या काळात ज्वारी, बाजरी, व गहु साठविण्याच्या विविधांगी पध्दती उपयोगात आणल्या जात होत्या यामध्ये कणगे हा महत्वपूर्ण प्रकार होता या कणगामध्ये जवळपास चार से ते पाचसे किव्टंलपर्यत ध्यान साठवुन ठेवले जात होते. असे आता धान्य साठविणुकीसाठी लोखंडी कोठ्या बाजारात आल्यामुळे कणगे लुप्त झाले आहेत. तसेच पुर्वीच्या काळातील गावरान मेवा हरवला आहे. पुर्वी परिसरात वर्षभर पुरेल एवढे ध्यान आणि बियाणे साभांळुन ठेवण्यासाठी विविध प्रकाराच्या पध्दती वापरल्या जात असत. या भागात ज्वारी, बाजरी,ऊस , कापुस, गव्हासह,अनेक पिंके घेतली जातात. पुर्वीच्या काळात ज्वारी, बाजरी, गहु,पिकांची काढणी झाल्यानंतर घरी आणुन कणग्यामध्ये साठवले जात होते. मात्र काळांतराने कणगे लुप्त होत गेले कणगे प्रामुख्याने बांबुच्या पातऴ काड्यांनी व घाणेरीच्या बारीक काड्यानी विणली जायची कणगी साधारण सहा ते सात पुटाची असायची नवी कणगी वापरण्यापुर्वी ती आतुन बाहेरून जनावराच्या शेणाने सारवुन घेतली जात असे उन्हात चांगली वाळल्यावर त्यात धान्य भरले जायचे धान्य भरून झाल्यावर कणगीच्या तोंडावर गवत पसरवुन ते जनावराच्या शेणाने लिपले जायचे कणग्यात धान्य अनेक वर्षे टिकत असल्याने याचा वापर केला जात होता शिवाय धान्याला किड लागत नसायची तसेच कोणत्याही रासायनिक प्रक्रिये शिवाय वर्षभरासाठी धान्य साठवले जात होते. त्याकाळी घरातील कणगी बघुन विवाह ठरविला जात असे पुर्वीचे लोक म्हणतात आता हीच कणगी हद्दपार झाली आहे. मातीचे अंगण असणार्या घरांनी आता सिंमेट काॅक्रिटची जागा घेतली आहे. त्यामुळे नुसती जागा नाही तर ग्रामीण भागातील गावरान मेवाही हरवुन गेला आहे. कणगी म्हणजे काय? त्याचा शेतकर्याना कोणता उपयोग होता. कणगी म्हणजे धान्य साठविण्याची एक रचना टोपली जशी बांबु व घाणेरीच्या फोक्यापासुन बनवितात तशिच कणगी देखील कणगीचा आकार हा रांजना सारखा किंवा तळापासुन (गोल) व्यास उंची पर्यंत वाढला आणि त्या नंतर निमुळता होत जातो. कणगी आतुन बाहेरून जनावराच्या शेणाने लिपली जाते. आणि उन्हात वाळवतात त्यात खरीप व रब्बी हंगामात धान्य वाळवुन भरतात थोडी रिकामी ठेऊन वरतुन पुन्हा जनावराच्या शेणाने हवाबंद होईल अश्या प्रकारे मिऴतात हवा बंद केल्या मुळे त्यामध्ये साठवलेले धान्याला किड लागत नाही धान्य कित्येक वर्ष कुढल्याही प्रकाराची प्रक्रिया न करता चांगल्या स्थितीत राहणे मात्र आता कणगी ची जागा प्लास्टिकच्या  डॖर्माने व पत्र्याच्या टाक्यानी घेतल्यामुळे धान्याला लवकर कीड लागते धान्याला किड लागु नये म्हणुन त्यामध्ये विश्षि्ट प्रकारची पावडर टाकली जाते. ते आरोग्यसाठी ही हानीकारक असु शकते:


तसेच आजच्या युगात रासायनिक खते व रासायनिक बियाण्याचा वापर जास्त प्रमाणात वापरहोता आसल्याने याकारणाणे शरीराला घातक होण्याची शकता नाकारता येत नाही. पुर्वीच्या काळात हे रासायनिक खते व किटकनाश न होते त्यामुळे आरोग्य चांगले व ठणठणीत होते. आता रासायनिक फळे व भाजी पाला खाऊ खाऊ विविध प्रकाराचे आजार जठलेले आहेत. या कारणीभूत म्हणजे रासायनिक व केमीकल खाल्याने शरीरात विविध प्रकाराच्या आजाराने लोक वयतागले:

Post a Comment

أحدث أقدم