सोयगाव येथे पत्रकार जनसंवाद यात्रेनिमित्त पोस्टरचे विमोचन


सोयगाव येथे पत्रकार जनसंवाद यात्रेनिमित्त पोस्टरचे विमोचन 

सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण 

सोयगाव 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) तर्फे लोकशाहीचा चौथा स्तंभ आलेल्या पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी दिनांक २८ जुलै  २०१४ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथून पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे.ही यात्रा मुंबई मंत्रालय येथे दी.२० ऑगस्ट २०२४ ला पोहचणार आहे.

 जनसंवाद यात्रेनिमित्त  सोयगाव येथे रविवारी (दी .२८) प्रसिद्धी पत्रकाचे सोयगाव तालुका पत्रकार संघाच्या तर्फे भैरवनाथ संस्थांनचे अध्यक्ष दिलीप शेठ बिर्ला यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.यावेळी भैरवनाथ संस्थांनचे अध्यक्ष यांनी पत्रकार  जनसंवाद यात्रेला शुभेच्छा दिल्या.तसेच पत्रकारांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी त्यांनी जनसंवाद यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) सोयगाव तालुका अध्यक्ष तथा दिव्यमराठी पत्रकार भरत पगारे, पत्रकार राजू दुतोंडे (पुण्यनगरी), विजय काळे (बाळकडू),ईश्वर  इंगळे (सकाळ),सुलेमान शेख (लोकमत समाचार),रवींद्र काटोले (मराठवाडा साथी),पूनम परदेशी (आत्ताच एक्स्प्रेस), यासिन बेग (बदलता महाराष्ट्र),योगेश पाटील (नवराष्ट्र), यादवकुमार (बाळू) शिंदे (लोकमत), अजय पाटील (नव भारत),सुनिल काळे (सामना), दत्तू काटोले (पुढारी) राजरत्न पगारे (देशोन्नती) व इंजिनियर विजय काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.फोटो ओळ :- सोयगाव - सोयगाव येथे पत्रकार जनसंवाद यात्रेनिमित्त पोस्टरचे विमोचन करतांना दिलीप बिर्ला व पत्रकार संघाचे पदाधिकारी

Post a Comment

أحدث أقدم

2

3