छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूल पिंपळनेर येथील 10 खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत निवड
पिंपळनेर,दि.23(अंबादास बेनुस्कर)
इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.सहभागी खेळाडूंपैकी तब्बल 10 खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली.
विजय खेळाडूंची नावे*
कामिनी बागुल,मोगी ठेंगे, आशिष सोनवणे,चेतन वेताळ,वेदांत नेरकर,कार्तिक शिंदे,हिना भोये,चेतन पाटील, हर्षल धोंडगे,भूषण कापडणीस.सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी शिवाजी अहिरराव,उपाध्यक्ष श्याम बेनीराम कोठावदे,सचिव रा.ना.पाटील,संचालक जगदीश ओझरकर,अनिता बागुल,सुनील अहिरराव,शेखर दळवी.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटील व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांनी कौतुक केले.
सर्व विजय खेळाडूंना सोनाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
