धाड पोलीस स्टेशनची कारवाई : अवैध दारु विक्रेत्याला बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार

धाड पोलीस स्टेशनची कारवाई : अवैध दारु विक्रेत्याला बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार

धाड (प्रतिनिधी अबुजर मिर्झा)



दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी धाड पोलीस स्टेशनने अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या अंकुश भागाजी शिंदे या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. शिंदे याच्यावर दाखल असलेले गुन्हे, तसेच परिसरात सुरू असलेल्या अवैध दारु विक्रीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी हद्दपारीचा आदेश दिला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस व पोलीस स्टेशन धाडच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

पोलीस प्रशासनाने इशारा दिला आहे की ग्रामीण भागातील इतर अवैध दारु विक्रेत्यांवर देखील अशीच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने