मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' टप्पा- 2 अभियानांतर्गत उर्दू माध्यमाच्या शाळांची पण निवड करण्यात यावी; शेख अब्दुल रहीम प्रतिनिधि शेख नईम सिल्लोड
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' पहिला टप्पा पूर्णपणे यशस्वी; हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे मुख्यमंत्री मा. ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन!
छत्रपती संभाजीनगर: राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब प्रथम आपले मनपूर्वक अभिनंदन व मनपूर्वक आभार! कारण आपण "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. आता राज्यात सध्या टप्पा - 2 राबविण्यात येत आहे यात एक कळकळीची विनंती की राज्यातील उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2’ या अभियानांतर्गत कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यातून/तालुक्यातून किमान 1 उर्दू जिल्हा परिषद शाळा, 1 उर्दू खाजगी शाळा आणि 1 मनपा/न.प शाळेची ही निवड करण्यात यावी जेणेकरून उर्दू शाळांनाही भरपूर प्रोत्साहन मिळेल. राज्यात अनेक उर्दू शाळा उत्कृष्टपणे अणि सुंदर आणि अप्रतीम शाळा सुरू आहेत याची दखल घेऊन राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातून/तालुक्यातून 1 उर्दू जिल्हा परिषदेची शाळा अणि 1 उर्दू खाजगी शाळेतून आणि 1 मनपा/न. प शाळांची ही निवड "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" टप्पा- 2 मध्ये करण्यात यावी अशा विनंतीचे निवेदन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी थेट मंत्रालयात मुख्यमंत्री मा. ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे. निवेदनावर साहेबांनी स्वतः लक्ष देऊन विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची एक एक प्रत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री.अजित दादा पवार साहेब, शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री.दिपकजी केसरकर साहेब, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मा. ना.श्री.अब्दुल सत्तार साहेब, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त मा.श्री.सूरजजी मांढरे साहेब, राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक मा.श्री.शरदजी गोसावी साहेब व एक प्रत विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनाही सादर करण्यात आली आहे...
