मुद्रांक विक्रेत्यांचे प्रश्नांसाठी यापुढे ही प्रयत्न करू: ना. झिरवाळ
पिंपळनेर,दि.20(अंबादास बेनुस्कर)
राज्यातील मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने देण्याचा प्रश्न सोडवू शकलो यांचे समाधान आहेच आता या पुढे वयोवृध्द,अपंग मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना हयातीमध्येच परवाने देणे, मुद्रांक विक्रीची मनोती वाढविणे,त्यांच्या जागेचा प्रश्न सोडविणे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथे दिले,शासकिय परवानाधारक मुद्रांक विक्रेता,अर्ज व दस्तलेखक संघटना,महाराष्ट्र राज्य,नाशिक च्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व ना.झिरवाळ यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी अध्यक्षस्थानी हाते.श्री नरहरी झिरवाळ यांच्या अथक प्रयलांमुळे राज्यतील मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने हस्तांतरणाचा शासन निर्णय महसुल व वनविभागाने दि.27 जुन रोजी निर्गमीत केला.त्या प्रित्यर्थ श्री.झिरवाळ यांचा सत्कार व संघटनेची 25 वी रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा दिंडोरी येथील संस्कृती लॉन्स मध्ये पारपडली त्यावेळी बोलतांना श्री.झिरवाळ म्हणाले की,मुद्रांक विक्रेत्यांच्या अन्य मागण्यासंदर्भात विधानसभा निवडणुकी पुवीं संबधीत अधिकारी,मंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णयसाठी प्रयत्न करेन. संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी,सरचिटणीस मनोज गांगुर्डे व अन्या पदाधिकारी यांनी ही श्री.झिरवाळ यांना राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांतर्फे स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार केला या प्रसंगी शासनमान्य मुद्रांक विक्रेता महासंघाचे भिसे, राहुल नाईक हे सुध्दा उपस्थितीत होते.सत्कार समारंभा नंतर संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये संघटनेच्या मागील वर्षातील इतिवृत्त वाचन व हिशेबांना मंजूरी देण्यात आली तसेच पुढील 2 वर्षांसाठी सर्वानुमते राज्य कार्यकारणी निवडण्यात आली.सरचिटणीस मनोज गांगुर्डे यांनी अहवाल वाचन केले.या वेळी उपाध्यक्ष शिवाजी भारगे,सुधाकर खंडाळकर,रतम साळवे, विभागीय अध्यक्ष शाम गवारे, प्रमोद ओझरकर,माधवराव पाटील,नितीन झोटींग यांच्यासह राज्यातील,चंद्रपूर,नागपूर,वर्धा,संभाजीनगर, परभणी,अमरावती, यवतमाळ,धुळे,नाशिक,पुणे, ठोणे,रायगड,गडचिरोली, भंडारा,गोंदीया,आदी जिल्हातील मुद्रांक विक्रेते व अर्ज व दस्तलेखक उपस्थितीत होते.मृतांच्या वारसांना परवाने देण्याची प्रथम अंमलबजावणी वर्धा जिल्हात झाली असून हिंगणघाटजिल्हा वर्धा येथील परवाना प्राप्त वारस रोमा बडवाईक यांचा संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. पदाधिकारी प्रमोद ओझरकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
