मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानासाठी सारोळा ग्रामपंचायतीत लोकवर्गणी संकलन उपक्रम उत्साहात संपन्न
📍 (पिशोर प्रतिनिधी अस्लम शेख)
ग्रामपंचायत सारोळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामपंचायत व लोकवर्गणी समितीच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी संकलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकवर्गणी समितीचे अध्यक्ष तेजराव केशवराव जंगले (माजी चेअरमन) यांनी भूषवले. समितीमध्ये रत्नाकर बाळा पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष), उपाध्यक्ष कैलास कडुबा धनगे, सदस्य जगन दामोदर जंगले, काकासाहेब किसन ढमाले आणि विठ्ठल राघोबा ढमाले यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
अभियानासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ३० हजार रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून संकलित केले. या देणगीत विठ्ठल राघोबा ढमाले, बजरंग गोटीराम राजपूत, आर्यन बाबासाहेब ढमाले, दीपक सोनाजी ढमाले, राजू नवले (ग्राम महसूल अधिकारी), सुनील बाबुराव ढमाले, जगन दामोदर जंगले, सविताताई जगन जंगले, एकनाथ कचरू लेनेकर, गौरव अशोक ढमाले, गणेश साहेबराव ढमाले व सुनील सदाशिव ढमाले यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर सरपंच सविता जगन्नाथ जंगले, उपसरपंच भगवत राजपूत, ग्रामसेवक काळेसाहेब भगवान ढमाले, तसेच प्रल्हाद जंगले, दगडू बनकर, साईनाथ साखरे, भिमराव जंगले आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
या लोकसहभागातून ग्रामपंचायत सारोळा ही ‘समृद्ध पंचायत राज्य अभियान’ यशस्वी करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
👉 स्रोत : सिल्लोड एक्सप्रेस / GS9N.com