श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न
पिंपळनेर, दि. 2 ऑगस्ट (प्रतिनिधी – अंबादास बेनुस्कर):
येथील श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 1 ऑगस्ट रोजी शाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य बी. एम. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमात जयश्री झगडे यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला, तर स्वाती गांगुर्डे यांनी शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य भामरे सरांनी दोन्ही थोर नेत्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील व सामाजिक जागृतीसाठीचे योगदान अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
यानंतर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. वर्गनिहाय विजेते पुढीलप्रमाणे:
- इ. 1ली – प्रथम: कुश सारगोट, द्वितीय: विराज जगताप, तृतीय: प्रियल सोनवणे
- इ. 2री – प्रथम: अनन्या सोनवणे, द्वितीय: नालंदा भामरे, तृतीय: हर्षीता शिंदे
- इ. 3री – प्रथम: रोहित गांगुर्डे, द्वितीय: मानवी राठोड, तृतीय (सहविजेते): लावन्या साळुंखे व मनस्वी अहिरराव
- इ. 4थी – प्रथम: तनु सारगोट, द्वितीय: सुकन्या देवरे, तृतीय: दिव्याची देशमुख
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री बाविस्कर यांनी केले. परीक्षक म्हणून रोहिणी नेरे, जयश्री झगडे व अंजली बागुल यांनी भूमिका बजावली, तर आभार प्रदर्शन पुनम देवरे यांनी केले.
📸 छायाचित्र: अंबादास बेनुस्कर
**वरील बातमी gs9n.com किंवा "सिल्लोड एक्सप्रेस