साक्री तालुक्यातील ककाणी जवळील घटना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले आणि जंगलात सोडले

साक्री तालुक्यातील ककाणी जवळील घटना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले आणि जंगलात सोडले


पिंपळनेर:


साक्री तालुक्यातील ककाणी येथील धरणा नजीकच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी सोडण्यात आल्याची माहिती परीक्षावधीन सहाय्यक वनसंरक्षक कुणाल बनकर यांनी दिली.ककाणी येथील प्रगतशील शेतकरी दगा लक्ष्मण बेडसे यांची धरणाजवळ बागायती शेती आहे.या शेतातील विहिरी जवळ बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येत असल्याचे लक्षात घेऊन बेडसे यांनी विहिरीमध्ये डोकावुन पाहिले असता विहीरीत बिबट्या पडल्याचे दिसले.ही माहिती बेडसे यांनी वन विभागाला दिली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. साधारणपणे बिबट्या 50 फुट खोल विहिरीतील पाण्यात पडल्याचे दिसून आले.यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबटला बाहेर काढण्यासाठी पिंपळनेर येथील वनविभागाच्या कार्यालयातून पिंजरा मागवला.त्यापूर्वी विहिरीत वनकर्मचाऱ्यांनी खाट सोडली.खाट सोडताच बिबट्याने पाण्यातून बाहेर येत खाटेचा सहारा घेतला.त्यानंतर जेसीबी च्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडला.बऱ्याच प्रतीक्षेनंतर बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली. बिबट्या पिंजऱ्यात येतात पिंजरा विहिरीतून बाहेर काढण्यात आला.बिबट्या पिंजऱ्यात अडकताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेच निःश्वास सोडला.नंतर बिबट्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग व पिंपळनेर येथील वनक्षेत्रपाल डी.आर.अडकिणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चौरे,संदीप मंडलिक, वनरक्षक पांडुरंग जेलेवाड, अमोल पवार,देविदास देसाई, सुमित कुवर,वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्रमोद गायकवाड, दानिश पटेल,हरी बहिरम, वनसमितीचे अध्यक्ष निंबा बेडसे,किशोर बेडसे,वन कर्मचारी भटू बेडसे,पंडित खैरनार,एकनाथ गायकवाड, किशोर माळीच,नितीन भदाणे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

2

3