सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे कैसर आझाद शेख इच्छुक

सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे कैसर आझाद शेख इच्छुक 

प्रतिनिधि शेख नईम सिल्लोड

सिल्लोड:-  दि 3 ऑगस्ट रोजी गांधी भवन शहागज औरंगाबाद येथे काँग्रेस आढावा बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे   सिल्लोड सोयगाव विधानसभा क्र.104 करिता येणाऱ्या 2024 निवडणुकीच्या उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मा. खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब व पक्ष निरीक्षक अँड. मुजाहेद खान साहेब यांना रु. 20 हजार रूपय ची डीडी व उमेदवारी अर्ज देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय अल्पसंख्याक विभाग चे  प्रदेश सरचिटणीस मोहम्मद कैसर आझाद अब्दुल गफूर शेख यांच्यासह मा. प्रकाश मूगदियाजी ,माजी आमदार जनाब एम.एम. शेख जी, सेवादल प्रदेश अध्यक्ष विलासराव औताडे जी, औरंगाबाद शहराध्यक्ष शेख यूसुफ लिडर ,सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील , अल्पसंख्याक विभागाकडून जिल्हाध्यक्ष जफर वहाब शेख , शहराध्यक्ष शेख फेरोज अकबर, देविदास दांडगे,  जिल्हा सरचिटणीस शांतीलाल अग्रवाल, कृष्णा बावस्कर, प्रकाश साखळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख मोईन सूभान,युवक काँग्रेस विधान सभा अध्यक्ष शेख आवेस आझाद, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जाबेर पठाण, अदि उपस्थित होते. तसेच महाविकास आघाडीत सिल्लोड सोयगाव विधान सभा मतदारसंघ काँग्रेस आय पक्षाला सोडण्यात यावा व मुस्लिम, दलित समाज जास्त प्रमाणात काँग्रेस चा मतदार असल्याने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक, एक विधान सभे साठी  मुस्लीम,दलित समाजातील काँग्रेस एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीस प्रतिनिधित्व पक्षातर्फे उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कैसर आझाद शेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय अल्पसंख्याक विभाग चे  प्रदेश सरचिटणीस मोहम्मद कैसर आझाद शेख यांनी यावेळी केली.


Post a Comment

أحدث أقدم

2

3