मलकापूरजवळ भीषण अपघात : पाच ठार, चार जखमी

मलकापूरजवळ भीषण अपघात : पाच ठार, चार जखमी


(बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान) – जळगाव जिल्ह्यातील मलकापूरजवळील भानगुरा फाट्याजवळ 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृतांमध्ये दोन पुरुषांसह तीन महिलांचा समावेश असून मृतांपैकी काहींची ओळख पटली आहे तर एक महिला अद्याप अनोळखी आहे.

अपघाताची माहिती

मुक्ताईनगरहून मलकापूरकडे भरधाव वेगात येणारी मारुती ईको कार (MH-46-EX-3120) ही भानगुरा फाट्याजवळ समोर चाललेल्या अज्ञात ट्रेलरवर पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे पूर्ण चक्काचूर झाले.

मृत व्यक्ती

  • साजिद अजीज बागवान (वय 30, रा. भुसावळ) – कार चालक, जागीच मृत्यू
  • संतोष तेजराव महाले (वय 45, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) – उपचारादरम्यान मृत्यू
  • तानिया साजिद बागवान (वय 28, रा. भुसावळ)
  • झुमा सिकंदर (वय 48, रा. भुसावळ, मुळगाव नादिया, पश्चिम बंगाल)
  • एक महिला (अनोळखी)

जखमी

  • पंकज दिलीप गोपाळ (वय 22, रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर)
  • दीपिका विश्वास (वय 30, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल)
  • टीना अजय पाटील (वय 45, रा. भुसावळ)
  • एक महिला (अनोळखी)

जखमींना तत्काळ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांची कारवाई

या घटनेबाबत अक्षय भास्कर सोनवणे (रा. चिखली) यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी मलकापूर पोलीस ठाण्यात अप. क्र. 133/2025 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत चालक साजिद बागवान याच्याविरुद्ध कलम 281, 106(1), 125(b) भा.दं.सं. तसेच कलम 184 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा तपास सपोनि हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहेकाँ नीता मारोती वाढे करीत आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, विभागीय महसूल अधिकारी तसेच शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment

أحدث أقدم