रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीचा सर्पदंशाने झाला मृत्यू हृदयद्रावक घटना
पिंपळगाव येथील दुर्घटना ;चिमुकल्या साईने दिला आईला अग्नी
सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण पहूर , ता . जामनेर रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या बहिणीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दि.१७/८/२४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिंपळगाव कमानी ( ता . जाननेर ) येथे घडली .याबाबत अधिक माहिती अशी की , पुजा काशिनाथ पवार ही २१ वर्षीय विवाहिता गोंदेगाव तांडा येथून पिंपळगाव कमानी येथे रक्षाबंधनासाठी आपल्या भावाकडे आलेली होती .शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तीन वर्षीय मुलगा साईसह खाटेवर झोपलेले असताना उजवा हात खाटेच्या खाली पडल्याने तेथे आलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतला . त्यांना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी तपासणीअंती मृत घोषित केले .पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले .
गेल्या ३ वर्षांपूर्वी पुजाचे लग्न झाले होते . त्यांच्या मृत्यूने वर्षांच्या चिमुकल्याचे मातृछत्र हरपले असून पिंपळगाव कमानी सह गोंदेगाव तांडा गावांवर शोककळा पसरली आहे .गोंदेगाव तांडा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . चिमुकल्या साईने आपल्या आईच्या चितेला अग्नी देताना उपस्थितांना गहिवरून आहे .पहूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे .
