आईचे स्वप्न साकार करण्यासाठी विधवा महिलेचा मुलगा तुषार झाला पी एस आय
पिंपळनेर,दि.22(अंबादास बेनुस्कर)
अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना परिस्थिती वर मात करीत पितुछत्र हरपल्यानंतर विधवा आईचे स्वप्न साकार करण्यासाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील तुषार अहिरे ने अथक परिश्रम घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम.पी.एस.सी परिक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक.पी.एस.आय झाला.
पिंपळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वैशाली विजय अहिरे यांच्या मुलगा तुषार विजय अहिरे यांने सन 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम.पी.एस.सी ची परिक्षा दिली होती तुषार ने 440 पैकी 308 गुण मिळवून अनुसुचित जाती प्रवर्गातुन पास झाला 15 व्या रॅक ने पोलिस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना महेनत व अभ्यास करुन विधवा आईचे स्वप्न साकार करण्यासाठी पी.एस.आय झाला यामुळे निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा सामाजिक कार्यकर्ते हाजी बलदार पठाण,हाजी जावीद सैय्यद,अयुब पठाण,वाजीद पठाण आदींनी तुषार अहिरे व त्यांचा आई वैशाली अहिरे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
