कै. कमलाकर सांडु कोल्हे सर यांचे दुःखद निधन – पिशोर परिसरात शोककळा

कै. कमलाकर सांडु कोल्हे सर यांचे दुःखद निधन – पिशोर परिसरात शोककळा


पिशोर, ता. कन्नड (प्रतिनिधी – अस्लम शेख)
पिशोर (डीगर) येथील ज्येष्ठ नागरिक, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व निवृत्त आदर्श शिक्षक कै. कमलाकर सांडु कोल्हे सर (वय ७६) यांचे दि. २७ जुलै २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पिशोर व परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर दि. २८ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता पिशोर येथील कोळंबी रोडवरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाकर कोल्हे सर यांनी शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाने ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वरिष्ठ लिपिक कुंदन कोल्हे व किशोर कोल्हे यांचे ते वडील होत, तर पिशोर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू मोकासे सर यांचे ते दाजी होते.

त्यांच्या निधनामुळे पिशोर गावातील विविध क्षेत्रातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षण आणि समाजकारण क्षेत्रात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

"ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच श्रद्धांजली."

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new