आमदाराच्या गाडीने युवकाला धडक; गंभीर जखमी कोमात

चिखलीत आमदाराच्या गाडीने युवकाला धडक; गंभीर जखमी कोमात


बुलढाणा प्रतिनिधी (सय्यद इरफान)
राजकारण्यांच्या गाड्यांचा बेफाम वेग पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाच्या जीवावर उठला आहे. आज सकाळी १० वाजता अमरावती विभागाचे शिक्षण आमदार किरण सरनाईक (रा. वाशीम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या युवकास जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना चिखलीत घडली.

या अपघातात कृष्णा नंदू लष्कर (वय २५, रा. गौरक्षण वाडी, चिखली) हा तरुण गंभीर जखमी होऊन कोमात गेला असून, त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे दाखल करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते. अपघातानंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकाला गाडीत टाकून रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी अशा घटना टाळण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा व अपघातग्रस्तांसाठी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

सध्या पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने