सावळदबारा नगरीत श्रीकृष्ण जन्मोत्सव व अवतार दिन जल्लोषात

सावळदबारा नगरीत श्रीकृष्ण जन्मोत्सव व अवतार दिन जल्लोषात


सावळदबारा (प्रतिनिधी – प्रमोद कोते)
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ही पवित्र नगरी श्रीकृष्ण जन्माष्टमी व अवतार दिनानिमित्त संपूर्ण कृष्णमय होणार आहे. गोपीनाथ पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरात 15 व 16 ऑगस्ट रोजी भव्य सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर आकर्षक सजावट व रोषणाईने उजळून निघाले असून भक्तांना भावमधुर वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.

अखिल भारतीय पंचकृष्ण परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत श्री लोणारकर बाबा महानुभाव (धाड) यांच्या मार्गदर्शनाखाली, मंदिर मंडळाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

प्रमुख कार्यक्रम :

  • 15 ऑगस्ट रात्री 9 ते 11 वाजता – प्रसिद्ध शेंदुर्णी येथील कलापटाकाकडून श्रीकृष्ण लीलांचे सादरीकरण.
  • 15 ऑगस्ट रात्री 12 वाजता – श्रीकृष्ण जन्माचा पवित्र क्षण, मंदिर परिसरात जल्लोषात साजरा.
  • 16 ऑगस्ट दुपारी 4 वाजता – भगवान श्रीकृष्ण मूर्तीची नगरपरिक्रमा, ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात.
  • 16 ऑगस्ट सायंकाळी 8 वाजता – रंगतदार दहीहंडी सोहळा, त्यानंतर महाप्रसाद.

मंदिरात आठ दिवस विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील तसेच बाहेरील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बंटी सुधाकर पुजारी, सोनू पुजारी व मंदिर समितीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new