विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती — वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांचा उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती — वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांचा उपक्रम 


पिशोर प्रतिनिधी : अस्लम शेख | सिल्लोड एक्सप्रेस / gs9n.com

कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिवाजी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी चिकलठाण सर्कलमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडाळी येथे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. एल. बी. गवळी, तसेच श्री. निकुंभ सर, श्रीमती साळुंखे मॅडम, श्री. चव्हाण सर, श्री. चौधरी सर यांनी सहभाग नोंदविला. तसेच वनविभागातील श्री. अशोक आव्हाडश्री. भाऊसाहेब वाघ हेही उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. टोम्पे यांनी “वानर, माकड, हरीण यांसारख्या वन्यप्राण्यांना घरगुती अन्न देण्याचे दुष्परिणाम” तसेच “बिबट्या अधिवासात विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावयाची काळजी” या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

जनजागृती उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरात वन्यजीव संवर्धनाची माहितीपत्रके लावण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांमार्फत पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर जनजागृती संदेशांचे पीडीएफ पाठविण्यात आले, ज्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात यश आले.

अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये वन्यजीवांविषयी आदरभाव, जागरूकता आणि सहअस्तित्वाची भावना दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

📍 संवाद आणि संवर्धन — निसर्गाशी जिव्हाळ्याचा धडा शिकविणारा उपक्रम!

Post a Comment

أحدث أقدم