🗳️ पिंपळनेर नगरपरिषद निवडणुक तयारीला वेग — इच्छुक उमेदवारांची संघटनात्मक बैठक

🗳️ पिंपळनेर नगरपरिषद निवडणुक तयारीला वेग — इच्छुक उमेदवारांची संघटनात्मक बैठक संपन्न 🏛️ 



(प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर | पिंपळनेर, दि.14)

पिंपळनेर येथे आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक व इच्छुक उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ रावल, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे होते, तर जिल्हा सरचिटणीस (संघटन) भाऊसाहेब देसले प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पिंपळनेर शहरातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक बांधणी, तसेच नगराध्यक्ष आणि प्रभागनिहाय उमेदवारांची निवड या संदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांनी तत्काळ जनसंपर्क मोहीम सुरू करावी. संघटनात्मक बळकटी, प्रभागनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांशी सशक्त संवाद यावर पक्षाचा भर असेल. उमेदवार निवडीची प्रक्रिया सर्वेक्षण आणि पक्षीय आढावा यांच्या आधारेच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस राज्य परिषद सदस्य इंजी. मोहन सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत भैय्या पाटील, प्रदीप कोठावदे, प्रा. सविताताई पगारे, सरचिटणीस शैलेंद्र आजगे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष इंजी. के.टी. सुर्यवंशी, पिंपळनेर मंडलाध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, पिंपळनेर (ग्रा.) मंडलाध्यक्ष विक्की कोकणी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगेश नेरकर, सुधामती गांगुर्डे आदींसह शेकडो कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सर्वांनी एकजुटीने आगामी निवडणुकीत पक्षाला बहुमताने विजय मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला.

📸 छायाचित्र : अंबादास बेनुस्कर
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या – gs9n.com | सिल्लोड एक्सप्रेस 📰 

Post a Comment

أحدث أقدم