🌟 सिल्लोडचा अभिमान : २६ महिन्यांच्या अथांगने प्रस्थापित केला जागतिक विक्रम 🌟
सिल्लोड (मानक संपादक हजारी सर) – धन्वंतरी सर्जिकल हॉस्पिटल सिल्लोडचे संचालक डॉ. दिपक अपार सर व डॉ. रिद्धी अपार मॅडम यांचा चिरंजीव अथांग रिद्धी दिपक अपार याने अवघ्या २६ महिन्यांच्या वयात जागतिक विक्रम नोंदवून सर्वत्र कौतुकाची थोरी प्राप्त केली आहे. या अभूतपूर्व यशाची नोंद वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे.
🏆 जागतिक विक्रमाची नोंद
१५ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अथांगने केवळ २ ते २.५ वर्षांच्या वयात १५० फ्लॅशकार्ड्स वाचून आणि अचूक ओळखून दाखवण्याचा विक्रम केला. अवघ्या १३ मिनिटे ५० सेकंदात त्याने –
- शास्त्रज्ञ व त्यांचे शोध
- जगातील सर्व देशांचे ध्वज
- भारतातील नामवंत व्यक्तिमत्त्वे
अशा १५० गोष्टी आत्मविश्वासाने आणि अचूकपणे सादर केल्या.
👦 अथांगची वैशिष्ट्ये
अथांग टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ न घालवता विविध ज्ञानप्रद उपक्रमांमध्ये रमतो. त्याला सर्व रंग, आकार (Shapes), फळे, प्राणी, थोर महापुरुष, जगातील ध्वज तसेच शास्त्रज्ञांचे शोध माहित आहेत. त्याचबरोबर तो अथर्वशीर्ष पठण, संस्कृत मंत्र, कविता, गाणी, देवांची Abcd आणि आपल्या देशाविषयीची महत्त्वाची माहिती सहज सांगतो.
👩👩👦 पालकांची मेहनत
अथांगच्या आईने तो फक्त दीड महिन्यांचा असतानाच फ्लॅशकार्ड दाखवणे, रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगणे व मंत्र म्हणण्याची सवय लावली. आई-वडील दोघेही डॉक्टर असून त्यांनी अथांगच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी मेहनत घेतली.
🌿 संस्कार आणि परंपरेचा संगम
अथांगच्या या यशामागे आई-बाबांची मेहनत, अम्मा-आब्बांची शिकवण आणि सुवर्णप्राशनासारख्या आयुर्वेदीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. योग्य आहार, औषधोपचार आणि संस्कार यांचा सुंदर संगम झाल्यामुळेच अथांग इतक्या आत्मविश्वासाने आणि वेगळ्या पद्धतीने आपली प्रतिभा जगासमोर मांडू शकला आहे.
संपूर्ण सिल्लोड व महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
अथांगला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌟