भरदिवसा घरफोडी प्रकरणात आरोपी जेरबंद – पाचोड पोलिसांची व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

भरदिवसा घरफोडी प्रकरणात आरोपी जेरबंद – पाचोड पोलिसांची व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी


पाचोड (पैठण प्रतिनिधी इकबाल शेख) | दिनांक: 01 जुलै 2025
पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील आडूळ गावात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात पाचोड पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत कुख्यात आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय 46, रा. मेरा बुद्रूक, ता. चिखली, जि. बुलढाणा) यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 2.70 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दिनांक 18 जून 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान, आडूळ गावात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 6 तोळे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम चांदीची पैजन व 1.40 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 228/2025, भा.दं.वि. कलम 305, 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची सूत्रे स्व:ता हाती घेत सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांनी गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

हस्तगत मुद्देमाल:

  1. राणी हार – 20.3 ग्रॅम
  2. नेकलेस हार – 12.7 ग्रॅम
  3. वितळवून तयार केलेली सोन्याची गोळी – 45 ग्रॅम (सोन्याचे चैन, अंगठी, पेंडंट वितळवून तयार)
    एकूण किमती – अंदाजे ₹2,70,000/-

या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सतिश वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

सदर कारवाईत पुढील अधिकारी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले:
सपोनि सचिन पंडीत, पो.उ.नि. महादेव नाईकवाडे, पोहेकॉ संदिप जाधव, संतोष चव्हाण, पोअं नागनाथ केंद्रे, कृष्णा बरबडे, गणेश रोकडे, अफसर बागवान, श्रीमंत भालेराव, सचिन राठोड, कासम पटेल, प्रमोद पटेल, शिवाजी मगर.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new