चिंचोली ली येथील 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; पोलीस तपास सुरू
कन्नड तालुका | 1 जुलै 2025 –
कन्नड तालुक्यातील चिंचोली ली येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील 19 वर्षीय मंगेश संजय पवार या तरुणाने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मृत मंगेश पवार याने काल रात्री उशिरा आत्महत्या केल्याचे त्याचे वडील संजय पवार यांनी कळविले. सकाळी 9:45 वाजता त्याला चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
ही माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी एम.एल.सी. क्रमांक 145/सी. एच. एन./2025 नुसार पोलिसांना माहिती दिली. यानंतर पीशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. 55/2025, कलम 194 भादंवि अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती डी.आर. लोखंडे यांनी दिली असून, पुढील तपास पोहेकॉ जी.एस. भताणे करत आहेत. घटनास्थळी पोहेकॉ किरण गंडे व पो.कॉ. सपकाळ यांनी भेट दिली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. (पिशोर प्रतिनिधी,अस्लम शेख) (gs9n.com)/ (सिल्लोड एक्सप्रेस वृत्त पत्र )