🌧️ पिशोर परिसरात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांवर गंभीर फटका; तात्काळ मदतीची मागणी

🌧️ पिशोर परिसरात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांवर गंभीर फटका; तात्काळ मदतीची मागणी


🗓️ दिनांक: 27 ऑक्टोबर 2025 | 📍 पिशोर प्रतिनिधी: अस्लम शेख | स्रोत: सिल्लोड एक्सप्रेस (gs9n.com)

कन्नड तालुक्यातील पिशोर व परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. परतीच्या पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन, भाजीपाला तसेच जनावरांच्या चारापिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडली आहे.

अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेले उत्पादन निसर्गाने हिरावून नेले आहे. काही आठवड्यांपूर्वीच आलेल्या पूरस्थितीमुळे शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच झालेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ केली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कर्ज, खत, बियाणे याचा खर्च प्रचंड वाढला असून आता चाऱ्याची टंचाईही निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पंचनामे पूर्ण न होणे आणि मदत न मिळणे यामुळे संताप व्यक्त होत आहे.

“शासनाकडून प्रत्यक्ष मदत मिळण्याऐवजी केवळ आश्वासनांची धूरफेक होते,” — असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पिशोर, नाचनवेल, चिंचोली, करंजखेडा, नागापूर आणि चिकलठाणा येथील शेतकऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून हेक्टरी नुकसानभरपाई थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण निसर्ग आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा सर्वाधिक फटका त्यालाच बसतो,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने मदत जाहीर करून प्रत्यक्ष वितरण सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे मत कृषी तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.


🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.gs9n.com
© सिल्लोड एक्सप्रेस — लोकांच्या समस्या, लोकांसाठी.



Post a Comment

أحدث أقدم