➤ आनंददायी शनिवार: जि. प. प्रा. शा. ढोरकीन शाळेत विद्यार्थ्यांनी साकारला रंगारंग नृत्याविष्कार
ढोरकीन प्रतिनिधी | शेख इकबाल भाई - GS9 न्यूज
आज दिनांक १२ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरकीन येथे “आनंददायी शनिवार” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमात इयत्ता सहावी अ, ब आणि क मधील विद्यार्थ्यांनी एक मनोहारी नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कोलते सर यांनी विद्यार्थ्यांना डान्सच्या स्टेप शिकवण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडले. याचबरोबर वानखेडे मॅडम यांनी फळ्यावर गीत लिहून विद्यार्थ्यांना गीताची ओळख करून दिली.
सांस्कृतिक विभागाचे प्रमुख पठाण सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं समन्वय कौशल्याने साधलं, तर केंद्र सर यांनी साऊंड सिस्टममध्ये मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेतलं दीक्षित मॅडम व कापुरे सर यांनी, ज्यांनी विद्यार्थ्यांसमोर नृत्य सादर करून त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
शाळेतील सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींनी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त टाळ्यांनी स्वागत करत त्यांचं मनोबल वाढवलं. शाळेच्या प्रांगणात हास्य-विनोद, नृत्य आणि आनंदाचा उत्सव पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाच्या विशेष क्षणांचे साक्षीदार ठरले GS9 मराठी न्यूजचे प्रतिनिधी श्री शेख एकबाल भाई, जे यावेळी विशेष उपस्थित होते.
📸 फोटो गॅलरी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या: www.gs9n.com