आरपीआय आठवले गटाच्या जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न

आरपीआय आठवले गटाच्या जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न


भुसावळ | दिनांक – 17 जुलै 2025
आरपीआय (आठवले गट) चे जळगाव जिल्हाध्यक्ष आदरणीय राजुभाऊ सुर्यवंशी यांच्या भुसावळ येथील निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत राजुभाऊ सुर्यवंशी यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनासह सर्वांना प्रेरणा दिली. त्यांनी सांगितले की, “पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी जळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधी नितीन सुरवाडे यांनी अधिक जोमाने काम करावे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहा.”

संविधानिक मार्गाने लढा देण्याची भूमिका
राजुभाऊ सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, “जर शासन व प्रशासनाकडून जनतेच्या समस्या वारंवार सांगूनही सोडवल्या जात नसतील, तर आपल्या संविधानिक लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून निदर्शने, आंदोलने, मोर्चा काढण्याची वेळ येऊ शकते.”

नवीन युवकांना संधी
पक्षामध्ये नव्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत असून, त्यांना विविध जबाबदाऱ्या व पदांवर काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सन्मान व स्वागत सोहळा
बोदवड तालुक्याच्या वतीने राजुभाऊ सुर्यवंशी यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संजय तायडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला युवराज तायडे, अनिल सुरवाडे, नितीन सुरवाडे, संदीप सुरवाडे, राजू शेजवळे, विकीभाऊ तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© gs9n मराठी | gs9n.com जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे

Post a Comment

أحدث أقدم

poads

new