डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालयात गणवेश वाटप, वृक्षारोपण आणि टिळक जयंती उत्साहात साजरी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालयात गणवेश वाटप, वृक्षारोपण आणि टिळक जयंती उत्साहात साजरी


पिंपळनेर, दि. २४ (प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर):
साक्री तालुक्यातील मैंदाणे येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालयात आज विविध उपक्रमांची रेलचेल दिसून आली. गणवेश वाटप, वृक्षारोपण तसेच लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी विजयराव सोनवणे होते. यावेळी संस्थेचे सचिव स्वप्निल पगारे, उपाध्यक्ष छाया पगारे, रामदास धनवई, मिलिंद महाजन तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय ॲड. संभाजीराव पगारे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
स्व. संभाजीराव पगारे यांच्या स्मृतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. याचवेळी अस्तिरक्षेचा वापर करून पर्यावरणपूरक वृक्षारोपण देखील करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात धनंजय सोनवणे यांनी शैक्षणिक कार्यातील योगदानाची आठवण करून देताना सांगितले की, “बापूसाहेबांनी आपल्या आयुष्याची संपत्ती शैक्षणिक संकुल उभारणीत खर्च केली. त्यांनी संस्थेला स्वतःचे किंवा कुटुंबीयांचे नाव न देता महान नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले.”

स्वप्निल पगारे व छाया पगारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन उमेश घरटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय पाटील, बागुल, श्रीमती चव्हाण, देवरे, श्री देसले, सोनवणे, अशोक चौरे, राजेंद्र कोतकर, राकेश शिंदे व इतर शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.🎉 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालयात कार्यक्रम उत्साहात! 👕 गणवेश वाटप • 🌱 वृक्षारोपण • 🕊️ टिळक जयंती📍मैंदाणे, साक्री तालुका 🧑‍🏫 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, स्मरण आणि संस्कार...🟠 विद्यालयात राष्ट्रीय विचारांचा संगम 🟢 विद्यालय प्रेरणा बने, हीच अपेक्षा!



📰 ही बातमी प्रकाशित: www.gs9n.com
(संपादक: जी एस शेख मराठी / सिल्लोड एक्सप्रेस) वृत्त पत्र


Post a Comment

أحدث أقدم

poads

new