धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल; माधवी गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष तर मेघा जगताप पिंपळनेर शहराध्यक्षपदी नियुक्त

धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल; माधवी गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष तर मेघा जगताप पिंपळनेर शहराध्यक्षपदी नियुक्त


पिंपळनेर, दि. ९ जुलै (प्रतिनिधी – अंबादास बेनुस्कर)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता पक्षबांधणी आणि संघटनात्मक बळकटीकरणावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.

पिंपळनेर येथील माधवी महेंद्र गांगुर्डे यांची धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी, तर मेघा किरण जगताप यांची पिंपळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी गांगुर्डे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जाहीर केल्या.

या नियुक्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा संपर्कप्रमुख मंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे व महिला निरीक्षक मेघा दराडे यांची मान्यता लाभली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

माधवी गांगुर्डे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "आमच्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. महिलांचा राजकीय आणि सामाजिक सहभाग वाढवून, शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत त्यांना सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध राहू."

मेघा जगताप म्हणाल्या, "पक्षसंघटन वाढवून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवून देण्यासाठी आम्ही समर्पित भावनेने कार्य करणार आहोत."

या संघटनात्मक बदलांमुळे आगामी ग्रामपंचायत, नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होणार असून, महिला आघाडीचे बळ वाढण्यासही हातभार लागणार आहे. पक्षाच्या धोरणांची आणि विचारधारेची पातळीवरून घराघरात पोहोचवण्याचा संकल्प या नव्या नेतृत्वाने घेतला आहे.


📰 वेबसाईट: www.gs9n.com
संपर्क: जी. एस. मराठी – सिल्लोड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new