नांदगाव तांडा, तिडका परिसरात पावसाची दांडी; बळीराजा चिंतेच्या खाईत

नांदगाव तांडा, तिडका परिसरात पावसाची दांडी; बळीराजा चिंतेच्या खाईत


🗓 दि. 19 जुलै 2025
✍🏻 प्रतिनिधी: शेरू शेख, सोयगाव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा, तिडका, घोसला व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून समाधानकारक पावसाअभावी शेतकऱ्यांचे संकट अधिकच गडद झाले आहे.

खरीप हंगामाच्या आशेवर पेरण्या करण्यात आल्या असल्या, तरी पावसाचा पुन्हा एकही शिडकाव न झाल्यामुळे पिके करपत असून त्यांची अवस्था वाळवंटासारखी झाली आहे.

शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या शेवटी झालेल्या थोड्याशा पावसावर भरवसा ठेवून कापूस, मका, तूर, सोयाबीन यांसारख्या पिकांची पेरणी केली होती. मात्र जुलै महिना संपत आला तरी पावसाचा मागमूसही नाही.

स्थानिक शेतकरी गणेश चव्हाण म्हणाले, "जर लवकरात लवकर पाऊस झाला नाही, तर आमच्या हातातोंडाशी आलेले अन्न हिरावले जाईल." पिकांमध्ये करपा व वाळवा दिसून येत असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये अशी भीती सतावत आहे.

सरकारने व कृषी विभागाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

📞 प्रतिनिधी संपर्क: शेरू शेख – 9225573435
🌐 वेबसाईट: www.gs9n.com



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new