🕯 १६ वर्षीय तरुणीची आत्महत्या : पिशोर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद

🕯 १६ वर्षीय तरुणीची आत्महत्या : पिशोर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद


पिशोर (प्रतिनिधी - अस्लम शेख)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागपूर गावात एक हृदयद्रावक घटना घडली. कामिनी प्रभू तुपशेंद्रे (वय १६) या अल्पवयीन तरुणीने २० जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबीयांनी तात्काळ तिला करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती पिशोर पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी या प्रकरणी अ.मृ. क्र. ६१/२०२५ कलम १९४ बी.एन.एस.एस. अंतर्गत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोहेकॉ एस. आर. भिवसने यांच्या ताब्यात असून, सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार कार्यरत आहेत.

कामिनीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


gs9n.com

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Recent

Random Post