व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीची प्रथम बैठक उत्साहात संपन्न

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीची प्रथम बैठक उत्साहात संपन्न


मालपूर प्रतिनिधी, शिंदखेडा तालुका
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची पहिली बैठक शासकीय विश्रामगृह, शिंदखेडा येथे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

या बैठकीत पत्रकार हिताचे आणि संघवाढीसाठीचे महत्त्वाचे विषय चर्चेत आले. पत्रकार सदस्य संख्या वाढविणे, महिला पत्रकारांना संधी देणे, तसेच पत्रकार भवन उभारणीसाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. प्रदीप दीक्षित (संघ अध्यक्ष), भालचंद्र पाटील (कार्याध्यक्ष), रवींद्र आर. पाटील (उपाध्यक्ष), प्रभाकर धनगर, प्रकाशनाना चौधरी (मार्गदर्शक), महेश गुजराथी (सल्लागार), मनोज गुरव (प्रसिद्धी प्रमुख), भुषण पवार (चिटणीस), संजय महाजन (सहचिटणीस), महेंद्रसिंह गिरासे (कोषाध्यक्ष), शोभा पाटील (महिला प्रतिनिधी) आदी उपस्थित होते.

कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “पत्रकार संघाचे लावलेले रोपटे हे भविष्यात वटवृक्ष व्हावे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्नशील राहावे.”

संघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप दीक्षित यांनीही मनोगत व्यक्त करत संघाच्या भव्य भविष्यासाठी सर्वांनी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

बैठक खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. शेवटी आभार प्रदर्शन भुषण पवार यांनी केले.— तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new