खळद येथे दुर्दैवी घटना : युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू (बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान)

खळद येथे दुर्दैवी घटना : युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू (बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान)


संग्रामपूर तालुक्यातील खळद गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, विठ्ठल महादेव आमझरे (वय 24) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर रोजी रात्री सुमारास 12 वाजता विठ्ठल आमझरे हे अनंता भाऊराव बिहाडे यांच्या शेतात काम करून घरी जात असताना अपघाताने त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. तातडीने शोध घेतला असता ते सापडले नाहीत.

दरम्यान, सततच्या शोधानंतर आज सकाळी पातुर्डा गावाजवळील पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

या प्रकरणी फिर्यादी देविदास तुकाराम आमझरे यांच्या तोंडी रिपोर्टवरून तामगाव पोलीस स्टेशन येथे मर्ग क्र. 43/2025 कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस ठाणेदार यांच्या आदेशानुसार बिट स. फौ. अशोक वावगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم