ग्रामपंचायत सावळदबारा येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी : प्रमोद कोते, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सावळदबारा येथे दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी गावातील आदिवासी बांधव, ग्रामस्थ, मान्यवर नागरिक तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या हक्क, परंपरा आणि संस्कृती जतन करण्याच्या संकल्पनेवर सखोल चर्चा झाली. मान्यवरांनी समाजातील एकोपा, शिक्षणाचे महत्त्व तसेच संस्कृती संवर्धनावर भर देण्याचे आवाहन केले.
या उपक्रमातून समाजातील बांधिलकी आणि परंपरेप्रती आदर व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी एकमुखाने ठरवले की, आदिवासी संस्कृती व वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.