ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ठेकेदारांनी काम केले सुरू; जामखेली धरणाच्या जलवाहिनीचे काम पाडले बंद
पिंपळनेर,दि.9(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील जामखेली धरणातून सामोडे पैकी घोड्यामाळ परिसरात पाणी पुरवठा होण्यासाठी जलवाहिनीच्या कामाला पेसा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ठेकेदाराने काम सुरू केले होते.सदर काम रविवारी आदिवासी पेसा संघर्ष समितीसह संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन करीत काम बंद पाडले. जामखेली धरणातून लिप्टिंद्वारे सामोडे अंतर्गत घोड्चामाळ परिसरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी टाकली जाणारी जलवाहिनीच्या कामासाठी लाभक्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींची परवानगी घेण्यात आलेली नव्हती.या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते.यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जलवाहिनीच्या कामाला विरोध करीत काम बंद करण्यात यावे,यासाठी आंदोलन केले.पीएसआय विजय चौरे,भूषण शेवाळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु, ग्रामस्थ ऐकण्याच्या तयारीत नसल्याने विभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्याशी आंदोलकांना दूरध्वनीवरून संपर्क साधत काम बंद ठेवून,संबंधित ठेकेदारांची चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन दिले.त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.*17 गावातील लोकप्रतीनिधींसह गावकऱ्यांनी घेतला सहभाग*
आंदोलनात सुरेश पवार, अमोल ठाकरे,प्रदीप भोई धनलाल जगताप,धर्मेंद्र भास्कर पवार,सरपंच अर्चना भोये तसेच 17 गावातून आलेले सर्व सरपंच शिवालाल भोळे सुवालाल भोये,संदीप भोये,भुन्या बागुल हेमराज भदाणे,शरद भदाने,मन्साराम भोये,दला देशमुख,कन्हैयालाल चौरे,मनोज साबळे,महारु पवार,प्रमोद भदाणे आदी उपस्थित होते.
छाया:अंबादास बेनुस्कर
