आदिवासी पश्चिम पट्टयात होळी उत्सवास सुरुवात
पिंपळनेर
,दि.10(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील
बारापाडा चौपाळे,रोहड,टेंभा पंचक्रोशीत..
हनुमंतपाडासह-परिसरात..पाच ते सात दिवस अगोदर होते होळी उत्सवाला सूरुवात.13 मार्चला होणार मुख्य होळीउत्सव..होळी नंतर रंगपंचमी,धुळवडा पाच दिवसानंतर होणार सांगता.होळी पेटवून पडल्यानंतर ही.. पुढे पाच दिवसानंतर( विसर्जन) विझवल्यावर होणार सांगता..हनुमंतपाडा येथे वडिलोपार्जित पारंपारिक आदर्श एक गाव एक होळीउत्सव शिमगा.. साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे आजही एक गाव एक होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते.या होळीच्या उत्सवाला साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरुवात झाली असून होळीला पुढे पाच ते सात दिवस बाकी असतानाच आदिवासी ग्रामीण भागातील गावा-गावात सुरवात होते,यात गावातील तरुण अविवाहीत मुले एकत्रीत यवून सायकांळी खोंड्या पेटवून आनंदीत होऊन याची चाहूल गावकऱ्यांना देतात.तर अविवाहित मुली सायंकाळी होळी गीत(लोल)गातात"होळी माय तू भोळी ग सदा शिमगा खेळी ग"ढोरक्या पोऱ्याची खोंड्या तोडी लया...री हाऊशी दिल्लीम लोल...लोल.
म्हणेजे होळीची गाणे आनंदाने,खुशीने सायंकाळी गावातील प्रत्येक घराच्या अंगणात जाऊन म्हणतात.असे पाच दिवस सतत पाचव्या दिवशी
प्रत्येकाच्या घरातून हरभरा,वाटाणा,गहू असे अण्णधान्य दिले जाते.या धान्याच्या होळीला नैवद्य म्हणून डाळ्या शिजवून चढवतात अशी ही प्रथा परंपरा सुरू आहे.फाग (पैसे) मागणे-रस्त्यावर दोन्ही बाजूला दोर हातात धरून पूजेचा टिळा लावून नारळ देऊन या पाच दिवसात ज्या-त्या गावात रस्त्यावरून ये- जा...करणाऱ्याच्या मोटर सायकल व ईतर वाहन धारक यांना आडवून त्याची पूजा करून त्यांच्याकडून फाग म्हणून पैसे मागितले जातात.ही एक जुनी परंपरा आजही सुरू आहे.हनुमंतपाडा,चिंचगावठाण,झोळीपाडातील लहान मोठ्या तीन गल्ली मिळून एक मोठ्ये गाव पण एकच होळीसाठी प्रसिद्ध आहे.येथील बुज्जूर्ग काही जेष्ठ जानकाकर काडून माहिती घेतली असता पुण्यनगरीशी बोलताना माहिती मिळाली की,त्यांच्या म्हणन्यानुसार साधारण याला जवळपास अनेक-वर्षापासून एक गाव एक होळी,गुण्यागोविंदाने एकत्र येऊन या गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रध्देने आनंदाने होळी,शिमगा साजरा करता.ही परंपरा संपूर्ण तालुक्यालाच नाही, तर जिल्ह्यात ही या गावाची,,,एक गाव एक होळी,,,बाबत चर्चा व माहिती आहे. हा एक आदर्श सर्व ग्रामीण व शहरी गावसाठी आहे.असे पाच दिवस पाचव्या दिवशी प्रत्येक घरातून पाच प्रकारचे धान्य मागितले जाते व खुशीने दिले जाते ते एकत्र शिजवून त्याचा डाळ्या म्हणून होळीला नैवद्य दाखवितात. होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण गावलोक एकत्र बसून एक दिवस अगोदर होळी घ्यायला जाण्यासाठी ठरवतात.जंगलातून जो लाकूड होळीसाठी आणला जातो तो कोणत्याही कामास न येणारा लाकूड म्हणजे सावर या नावाचं झाड होय.54 लाकडाची होळीसाठी निवड केली जाते व ती होळी म्हणून पुजा करून पेटवून साजरी केली जाते.हे आदिवासी बांधवना आधीपासून पर्यावरण रक्षण जंगल व लाकूड यांचे महत्व माहीत होते.कामाचं लाकूड होळीसाठी तोडला जात नाही.सायकळी नवे कपडे घालून,सजून धजून एकत्र येऊन होळीच्या मुख्य ठिकाणी जमतात.सर्व जमा झाले अशी खात्री झाली की,(जागल्या) गावाचा म्हणजे गावकऱ्यांचा कामदार याला होळीची पुजा झाल्यावर होळी पेटवण्याचा मान दिला जातो.होळी पेटवली की सगळे आनंदाने आपले गोड अन्नपदार्थ बोना( नैवद्य)दाखवतात,चडवतात.गावातील कोणालाही याच वर्षात मुलगा वा मुलगी झालेली/झालेला असेल तर मुलगासाठी नारळ, व मुलगीसाठी खोबऱ्याची वाटी होळीची वाटी,नारळ म्हणून वाहििली जाते.अशी ही परंपरा आहे.होळी पेटून खाली पडेपर्यंत कोणीही खाली बसत नाही.असा नियम असतो.जो खाली बसला त्याचाकडून दंड म्हणून घेतल जाते,अशी ही परंपरा आहे.ती मात्र आता काही प्रथा लोप पावत चालली आहेत.आदिवासी परंपरेनुसार हे टिकवणे महत्वाचे आहे.दोन दगड दोन्ही बाजूला ठेवून त्याचा भाला केला जातो.व दोन सागाच्या लाकडाची लहान छोठ्या काठ्या गाडून त्याला आंब्याच्या पानांपासून तोरण बांधले जाते.त्या तोरणाखालून सगळे नारळ वाटी होळीची व्हायली जाते. होळी पडली की,पाखरी झेलून घेतीली जाते,आणि मग त्याला पाच फेरा मारून नदीला ही पाखरी पाण्यात दाबून आल्यावर होळीचा कपाळी टिळा लावून एकमेकांना शुभेच्छा!
भेठी गाठी घेऊन,मग उशिरा जेवण केले जाते.होळी पडल्या नंतर पाच दिवस पुढे याचा उत्साह चालतो.पाचव्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख आणून ती आपापल्या संपूर्ण घराला कोठी-कनगीला पाण्यात कालवून लावतात.पाचव्या दिवशी पुन्हा एकदा गावातील सगळे गावकरी आनंदाने एकत्र येऊन होळी विझवण्यासाठी गावातील पाच पोरीना (मुलींना)मान देतात.नवीन पाणी आणून ती विझवतात.या पाच ते सात दिसांपासून चाललेल्या होळी उत्सवाची सांगता मोठ्या आनंदाने पार पडते.अशी ही संपूर्ण परंपरा हनुमंतपाडा गावातील सर्व आदिवासी बांधव आज ही तर आपल्याला सुद्धा या डिजिटल धावत्या युगात आदिवासी बांधव करतात हे विशेष.
छाया:अंबादास बेनुस्कर
