दि.9,विशेष साहाय्य योजनेच्या संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेच्या तालुक्यातील

 सिल्लोड ( प्रतिनिधी )


दि.9,विशेष साहाय्य योजनेच्या संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेच्या तालुक्यातील 15 हजार 800 लाभार्थ्यांच्या खात्यात माहे एप्रिल, मे, आणि जून अशा तीन महिन्यांचे 6 कोटी 95 लाख 500 रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसात एकूण 3 महिन्याचे अनुदान मिळणार आहे. ना. अब्दुल सत्तार यांनी याबाबत तहसिल प्रशासनाला निर्देश दिले होते.गेल्या आठवड्यात ना. अब्दुल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शासनाच्या विविध योजनेचा खातेनिहाय आढावा घेतला होता. याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी, श्रावण बाळ यासारख्या योजनांच्या संचिका मंजूर करण्यासंदर्भात नियमित बैठक घेने तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येक  महिन्यात अनुदान वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने प्रशासनाच्या वतीने याबाबत तातडीने कारवाई करण्यात आली. ना. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्याचे अनुदान मिळणार आहे.लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्याने गेल्या काही दिवसांपासून निराधार योजनेची बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे  निराधार योजनेसंबंधी लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याने निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी  राहिलेल्या वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आवाहन पणन व अल्पसंख्यांक विकास मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

-----------------------------------------------

Post a Comment

أحدث أقدم

2

3