मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाची अंमलबजावणी रेशनकार्ड ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

 


मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाची अंमलबजावणी रेशनकार्ड ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा -  अब्दुल समीर यांचे अवाहन सिल्ल्लोड ( प्रतिनिधी ) दि.9, सिल्लोड तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून ज्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन झालेले नाही त्यांनी त्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन करून घ्यावे असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी गाव संवाद दौऱ्या दरम्यान गावकऱ्यांशी बोलतांना केले.तालुक्यातील एकही रेशनकार्ड लाभधारक ऑनलाईन व इतर कारणांमुळे धान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारचे निर्देश ना. अब्दुल सत्तार यांनी दिले होते. त्याअनुषंगाने पुरवठा विभागाच्या माध्यमातून या निर्देशाची कटाक्षाने अंमलबजावणी करण्यात आली असून सिल्लोड तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासह रेशनकार्ड बाबत विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येत आहे.या बाबत माहिती देत असतांना अब्दुल समीर म्हणाले की, मंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब दौऱ्यावर असतांना अनेकांनी ऑनलाईनच्या कारणामुळे रेशन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यावर ना. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने रेशनकार्ड ऑनलाईन करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेशनकार्ड ऑनलाईन न झालेल्या लाभार्थ्यांनी आपले रेशनकार्ड ऑनलाईन करून घ्यावे जेणे करून आपले हक्काचे धान्य लवकरच मिळेल.प्रत्येक लाभार्थ्यांना रेशन मिळावे तसेच एकही लाभार्थी रेशन पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत. तरी देखील रेशन मिळण्यास दिरंगाई होत असेल तर सिल्लोड येथील ना. अब्दुल सत्तार साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे संपर्क साधावा असे अवाहन अब्दुल समीर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

2

3