जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या संपास महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क

जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या संपास महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क


संघटनेचा जाहीर व सक्रिय पाठिंबा !

शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि 

अधिकार की लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते,जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन मे आ जाते है..!


छत्रपती संभाजीनगर:  जुन्या पेन्शनसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नियोजित 29 ऑगस्ट 2024 पासूनच्या पुकारण्यात आलेल्या संपास महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने सक्रिय व जहाई पाठींबा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, मुंबई यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी व शिक्षकाच्या इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पासून सर्व शिक्षक संपावर जात असल्याचा इशारा महाराष्ट्र शासनास दिलेला आहे. राज्यातील शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगीकरण थांबवावे, महागाई भत्ता थकबाकी तात्काळ देण्यात यावी, आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तात्काळ समितीचे गठन व्हावे आशा विविध मागण्यासाठी या संपास महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेनी पाठींबा दिलेले आहे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतरांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

2

3