पोलीस प्रशासन महिलांची सुरक्षिततेसाठी भावासारखा पाठीशी आहे-किरण बर्गे

पोलीस प्रशासन महिलांची सुरक्षिततेसाठी भावासारखा पाठीशी आहे-किरण बर्गे 



पिंपळनेर,दि.25(अंबादास बेनुस्कर)मुलींनी राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्या अनुकरण करावे तर स्वतःचे रक्षण व जीव वाचविण्यासाठी खंबीर बना पोलीस प्रशासन महिलांची सुरक्षिततेसाठी भावासारखा पाठीशी उभा आहे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी विशाखा महिला तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समिती स्थापन प्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले. येथील कै.नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात 8 वी ते 12वी च्या विद्यार्थिनींसाठी विशाखा महिला तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समिती स्थापन करणे प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस प्रशासन महिलांची दक्षता घेण्यासाठी भावासारखा पाठीशी आहे यासाठी स्वतःसमोर या 112 नंबर डायल करून मदत मागा चूप राहिल्याने गुन्हा वाढत जातो सक्षम व्हा.यावेळी प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार बापू बळीराम, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे,संस्थेचे सचिव महेंद्र गांगुर्डे,डॉ.शुभांगी कोतकर डॉ.शितल काळे, अंगणवाडी शिक्षिका मनीषा शिंदे विद्यार्थ्यांनी पालक अर्चना शहा सविता पाटील प्रमोद गांगुर्डे,शिक्षिका पूनम मराठे,उदय एखंडे,अतुल भदाने,होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्यध्यापक पी एल गोयकर होते.यावेळी डॉ.शुभांगी कोतकर यांनी विद्यार्थ्यांना गुड टच बॅट टच ही संकल्पना सांगत मुलींनी देखील कुटुंबातून चांगले संस्कार घेण्याची गरज व्यक्त केली आईने देखील मुलीला मैत्रिणीसारखे वागणूक देऊन तिच्याशी हेतू कूच करावा असं सांगितलं तर डॉ.शितल काळे यांनी मुलींनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे अभ्यासातून प्रगती साधावी बाह्य प्रदर्शन करण्यापेक्षा आपले गुणात्मक हुशार असण्याची वेळ आहे शिक्षकांकडून कुटुंबातून चांगल्या गोष्टी शिकून स्वतः आत्मा परिवर्तन करा असे काळे यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका राजश्री आठवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल पगारे तर आभार शिक्षिका रूपाली पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

2

3