जिरे माळी समाज सेवा संघाकडून कौतुकाची थाप घोडदे येथे गुणवंत विद्यार्थी,

जिरे माळी समाज सेवा संघाकडून कौतुकाची थाप घोडदे येथे गुणवंत विद्यार्थी,


समाजबांधवांचा सत्कार

पिंपळनेर,दि.18

(अंबादास बेनुस्कर) जिरे माळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्यांतर्गत धुळे जिल्हा,साक्री तालुका तसेच घोडदे ग्रामस्थ यांच्यातर्फे 2023-24 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तसेच समाजातील विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार समारंभ नुकताच संत सावता माळी समाज प्रबोधन मंडळ संचलित घोडदे (ता.साक्री) विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झाला.सोहळ्यात 200 गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्माचिन्ह देण्यात आले, तसेच 50 विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांनाही सन्मानित करण्यात आले.नाशिक येथील उद्योजक चंद्रकांत बागूल अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाचे उद्घाटक समाजभूषण अॅड.संभाजी पगारे,जिरे माळी समाजसेवा संघाचे संस्थापक नारायण नवले,एम.एच.पाटील, शिवसेना(उबाठा)धुळे महानगरप्रमुख धीरज पाटील, हेमलता मानकर यांच्यासह मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव,संजय ढोले,ज्ञानेश्वर एखंडे,नारायण पाटोळे,सुनील गवळी,व्ही.एन.जिरे,अनिकेत सोनवणे,वसंत घरटे,मधुकर साळवे,काशीनाथ नंदन,बाळू सोनवणे,साहेबराव गवळी,बी.डी.नंदन,मोहन महाजन,दिलीप सोनवणे,माधुरी सागर साळवे, रोहिदास साळुंखे,दामोदर पगारे,मुकुंद घरटे,रावसाहेब घरटे,पंडित साळवे,आर.जे. पाटील,डी.पी.पाटील,हिंमत पगारे,दीपक घरटे,डिगा बापू घरटे,अरुण घरटे,अशोक देशमुख,कविता क्षीरसागर,संजय साळवे,अनिल पवार,अनिल घरटे,अमृत घरटे,वैजनाथ घरटे आदी उपस्थित होते.कमलाकर नंदन,योगेश क्षीरसागर,सतीश पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना(उबाठा) उपतालुकाप्रमख अमोल क्षीरसागर यांनी केले.उपस्थितांचे आभार माजी राज्य कार्याध्यक्ष प्रा.डी.टी. पाटील यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم

2

3