पिंपळनेरच्या विद्यालयात राखी बनवण्याची स्पर्धा संपन्न

पिंपळनेरच्या विद्यालयात राखी बनवण्याची स्पर्धा संपन्न



पिंपळनेर,दि.20(अंबादास बेनुस्कर)

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पकतेला वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यादृष्टीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने पिंपळनेर येथील शांताई माध्यमिक विद्यालयात  राखी बनवण्याची स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत एकूण 15 विद्यार्थी सहभागी होते.यात प्रथम खुशी बागुल,द्वितीय नव्या बागुल आणि तृतीय क्रमांक उन्नती वंजारी यांनी पटकावला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून सुंदर राखी बनवल्या.

विद्यालयाचे मुख्याध्यापक शेखर बागुल यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.परीक्षक म्हणून आकाश ढोले यांनी काम पाहिले.

Post a Comment

أحدث أقدم

2

3