सिल्लोड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी रईस खान पठाण यांची नियुक्ती

सिल्लोड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी रईस खान पठाण यांची नियुक्ती


सिल्लोड (दि. 08 सप्टेंबर 2025) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) सिल्लोड शहराच्या कार्याध्यक्षपदी रईस खान निसार खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(फुलंब्री प्रतिनिधी बशीर पठाण)

सिल्लोड येथील आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. सतीश चव्हाण यांच्या हस्ते रईस खान पठाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, सिल्लोड तालुका निरीक्षक राहुल डकले, नितीन धुमाळ, तालुकाध्यक्ष देविदास मामा आमटे, भाऊसाहेब तरमळे, अनिल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष शेख अमान, दादाराव काळे, सिल्लोड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय पाटील, प्रवीण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात पक्षाचे नेते श्री. ठगण पाटील भागवत यांनी रईस खान पठाण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم