गुरुपौर्णिमा उत्सव ओम साई राम ग्रुपतर्फे उत्साहात साजरा

गुरुपौर्णिमा उत्सव ओम साई राम ग्रुपतर्फे उत्साहात साजरा


मालपूर (प्रतिनिधी प्रभाकर अडगळे): गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ गुरूंचा गौरव करण्याचा दिवस नसून, हा दिवस शिष्याच्या कृतज्ञतेचे प्रतीक मानला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अत्युच्च आहे – "गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना जीवन नाही" हे तत्त्व अंगीकारत ओम साई राम ग्रुप संघटनेच्या वतीने सद्गुरू श्री साईनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात गुरूंच्या स्मरणासोबतच त्यांच्या जीवनदृष्टीचा जागरही करण्यात आला. "गुरू हा सुखाचा सागर, प्रेमाचा आगर, आणि धैर्याचा डोंगर" या भावना प्रत्येक साईभक्ताच्या मनात जागृत झाल्या.

कार्यक्रमावेळी संघटनेचे अध्यक्ष किरण भैय्या पाकळे, तसेच वासुदेव बागुल, देविदास बागुल, अमोल महाले, सागर मोरे, भूषण महाले, लखन पाटील, नन्या सासके, रोहित पवार, साहिल खाटीक यांच्यासह अनेक साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दिवशी गुरूंच्या आठवणी जागवून प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्मरण करत त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले. ओम साई राम ग्रुपच्या या उपक्रमामुळे गुरुपौर्णिमेला एक विशेष भक्तिमय आणि प्रेरणादायी स्वरूप लाभले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new