पाळोदी–बावनबीर रस्त्यावर दुचाकींची भीषण टक्कर; दोन युवकांचा मृत्यू, चार जखमी

पाळोदी–बावनबीर रस्त्यावर दुचाकींची भीषण टक्कर; दोन युवकांचा मृत्यू, चार जखमी


(बुलढाणा प्रतिनिधी – सय्यद इरफान)

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल–एकलारा रोडवर काल (२८ ऑगस्ट) संध्याकाळी दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांची नावे

  • गणेश हरिदास ढोले (रा. पाळोदी)
  • अजय लहासे (रा. बावनबीर)

घटनेची माहिती

प्राप्त माहितीनुसार, अपघातात एक महिला व पाच युवकांचा समावेश होता. ज्या दुचाकीवर महिला बसली होती ती पाळोदी येथील असून दुसरी दुचाकी बावनबीर येथील असल्याचे समजते. सदर महिला टुनकी येथे अंत्यविधीसाठी आल्या होत्या.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

परिसरात हळहळ

या दुर्घटनेमुळे पाळोदी व बावनबीर परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new