धाड पोलीस स्टेशन हद्दीत ९५ गुन्हेगारांना हद्दपार

धाड पोलीस स्टेशन हद्दीत ९५ गुन्हेगारांना हद्दपार

(धाड प्रतिनिधी अबूजर मिर्झा)


बुलडाणा जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडावी, यासाठी बुलडाणा पोलीस प्रशासनाने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार धाड पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांतता भंग करणारे, जातीय गुन्हेगारी प्रवृत्तीचे, दंगलखोर, अवैध दारू विक्री करणारे व समाजविघातक कृत्य करणारे अशा एकूण ९५ गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

ही कार्यवाही भारतीय न्यास सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३(२) नुसार करण्यात आली असून, दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ ते ०६ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.

या कारवाईसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या देखरेखीखाली, ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस यांच्या नेतृत्वाखाली धाड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

ही कारवाई होत असल्याने जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाचे आयोजन अधिक सुरक्षित आणि शांततेत पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने