आडुळ येथे दुचाकी चोरांचा धुमाकूळ; शेख वकील चांद दुचाकी घरासमोरून चोरीला

आडुळ येथे दुचाकी चोरांचा धुमाकूळ; शेख वकील चांद दुचाकी घरासमोरून चोरीला


📰 आडुळ प्रतिनिधी – सिराज बागवान
पैठण तालुक्यातील आडुळ बुद्रुक येथे दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा आपली उपस्थिती दाखवत वकिल चांद यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

गावातील वकील चांद सेठ शेख यांच्या मालकीची शाईन दुचाकी (MH 20 DR 8964) ही त्यांच्या राहत्या घरासमोरून रात्रीच्या वेळेस चोरीला गेली.

ही दुचाकी चोरीची एक आठवड्यातील दुसरी घटना असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.

सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे आडुळ गावातील नागरिकांमध्ये अस्वस्थता असून पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून आरोपींचा छडा लावावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new